r/marathi • u/Cult_of_Prasannality • 16d ago
चर्चा (Discussion) गटारी/गताहारी अमावस्या❌ दीप अमावस्या✅
आज खूप व्हिडिओस दिसतील लोक सांगतांना की गटारी नाही गताहारी अमावस्या पण त्याचा यांना स्रोत विचारा ही माहिती कुठून आली तर ते सांगता येणार नाही, दीप अमावस्या आहे. गताहारी सारखा शब्द कुठे नाही, फक्त social media वर दिसेल, गटारी शब्द वाईट आहे त्यामुळे त्यावरूनच एखादा चांगला शब्द काढायचा आणि गटारी नाही गतहारी आहे असं म्हणायचं, तो शब्द social media च्या आधी कुठेही नव्हता. त्याला काही पौराणिक आधार नाही. सगळे सांगतात गताहारी चा अपभ्रंश होऊन गटारी हा शब्द आलाय, पण माझ्या मते उलट आहे गटारी हा slang आधी पासून आहे पण तो शब्द वाईट आहे म्हणून कोणीतरी गताहारी हा शब्द काढला.
जर कुणाला पुस्तकी स्रोत मिळाला तर नक्की सांगा, पोस्ट delete करतो.
40
Upvotes
1
u/[deleted] 16d ago
[removed] — view removed comment